खडका एमआयडीसीतील बेकरीतून 68 हजारांचे साहित्य लांबवले –

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील खडका एमआयडीसीतील एका कंपनीतून चोरट्यांनी 68 हजार रुपये किंमतीचे साहित्य लांबवले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्र पुंडलिक चौधरी (53, गायत्री नगर, नाहाटा महाविद्यालयाजवळ भुसावळ) यांनी भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, खडका एमआयडीसीत सनराईज बेकर्स नावाची डी.138 मध्ये बेकरी उत्पादन करणारी फॅक्टरी आहे. अज्ञात चोरट्याने 15 ते 16 फेब्रुवारीदरम्यान संधी साधून बेकरीतील 15 हजार रुपये किंमतीची एसी, आठ हजार रुपये किंमतीचा टीव्ही, 20 हजार रुपये किंमतीचे इन्व्हर्टर, तीन हजार रुपये किंमतीचे फिल्टर, 10 हजार रुपये किंमतीचा संगणक व प्रिंटर, 10 हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे मिळून एकूण 68 हजारांचे साहित्य लंपास केले. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.