संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्साहात साजरा ;

भुसावळ – ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात ब्रम्हांडनायक तथा शेगाविचा राणा श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रगटदिन जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे गुरूवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही प्रगटदिनानिमित्त प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा स.५:३०. ते ७:३० पर्यंत झाली. मंदिरात श्री गजानन महाराजांच्या मूर्तीस तसेच श्री रामचंद्र दरबार, श्री हनुमान, श्री विठ्ठल रखुमाई, महाराजांच्या पादुका ही आकर्षक फुलांनी सजविलेल्या हाेत्या. तसेच रंगीबेरंगी रांगाेळयाही परीसरात काढलेल्या हाेत्या, मंदिरात व कळसावर लायटींगही लावलेली हाेती, यामुळे मंदिर परीसर मंगलमय दिसत हाेता. दरम्यान सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायणास स.६ वाजेपासून सुरूवात झाली असता बहुसंख्य भाविक पारायण वाचनास बसलेले होते. श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी झालेली हाेती. तसेच पिठलं,पाेळी व बुंदीचा लाडू महाप्रसाद वाटपास स. ९ वाजता सुरूवात करण्यात आली असता रात्री उशीरापर्यंत प्रसाद वाटप सुरू हाेते. भाविकांनी महाप्रसादासाठी साहित्य आणून दिल्याने मंदिर प्रशासनाने आभार व्यक्त केलेले आहेत.

  'सेवेकरी' यांचे उत्कृष्ट नियाेजन

 प्रगटदिनानिमित्त हाेणारी गर्दी लक्षात घेता स्वयंस्फुर्तीने अनेकांनी 'सेवेकरी' हाेत भाविकांना सेवा दिल्याने मंदिर परीसरात उत्कृष्ट नियाेजन केलेले दिसत हाेते.

संध्याकाळी लागली भली माेठी रांग
श्रीं च्या दर्शनासाठी संध्याकाळी भाविकांची गर्दी वाढत जात मंदिरापासून ते जामनेर राेडवरील पेट्राेल पंपा पर्यंत रांग लागल्याचे दिसत हाेते.

संध्याकाळी एकेरी मार्गावरून वाहतूक
संध्याकाळी भाविकांची गर्दी वाढू लागल्याने मंदिरा समाेरील जामनेर राेड वर एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू ठेवल्याने भाविकांना मंदिरात जाणे साेईचे झाले होते.

 पाेलीस व हाेमगार्ड बांधवांनीही केली सेवा
 पाेलीस विभागाने  मंदिर परीसरात भाविकांच्या झालेल्या गर्दिवर तसेच जामनेर राेड वरील वाहतुकीवर नियंत्रण राखत चोख सेवा केली.