जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्षा सौ मनीषा पाटील यांनी प्रास्तविक व ऍडव्होकेट सीमा जाधव यांनी छत्रपती शिवरायांच्या विचार मांडले. नेहा जगताप व नूतन तासखेडकर, वंदना मंडावरे, हर्षा गुजराथी, माधुरी शिंपी,, नीता विसावे यांनी शिवाजी महाराजांचा पाळणा व पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्योती राणे यांनी व आभार किमया पाटील यांनी केलें तंत्रसहाय्य शिल्पा बयास यांनी केलें.


