सेट पॉल स्कुल मध्ये शिवाजी महाराज जयंती साजरी.


भुसावळ – भुसावळातील साकरी फाटा जवळील सेंट पॉल इग्लिश मिडीयम स्कुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

बाबाब यावेळी संस्थेचे सचीव समीर शेफर्ड,मुख्याध्यापिका रुबीया शेफर्ड यांनी छत्रपती शिवाची महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव समीर शेफर्ड यांनी छत्रपती शिवाची महाराज यांच्या जिवणावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेतील विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेशभूषा करून आले होते. याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.