सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर तर्फे हळदी कुंकु साजरे ; लकी ड्रॉ च्या पैठणीने आणली धमाल ;

भुसावळ – येथील सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर तर्फे हळदी कुंकु समारंभ रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी प्रभाकर हॉल भुसावळ येथे मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दिप्ती चौधरी आणी प्रतिक्षा मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे या होत्या.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश वंदना व दिपप्रज्वलन करण्यात आले .हळदीकुंकू या कार्यक्रमात लकी ड्रॉ , वन मिनीट प्रश्नमंजुषा , बलून गेम हळदी कुंकू- तिळ-गुळ ही गेम खेळण्यात आली यावेळी डॉ मृणाल यांनी व सौ प्रतिक्षा यांनी बलून गेम व हळदी कुंकू- तिळ-गुळ ही गेम चे ( बक्षीस वितरण) बक्षीस हे सकल लेवा महिला मंडळ यांच्या उपाध्यक्ष सौ प्रभा पाटील आणि सचीव सौ राजश्री कोलते कडुन देण्यात आली तर लकी ड्राचे प्रायोजक कस्तुरी साडीच्या संचालक वैशाली महाजन यांनी तीन पैठण्या लकी ड्रॉ साठी स्पॉन्सर केल्या लकी ड्रॉ विजेते व वन मिनीट प्रश्नमंजुषा डॉ मृणाल यांनी व सौ प्रतिक्षा यांनी बलून गेम व हळदी कुंकू- तिळ-गुळ ही गेम खेळली सर्व गेम चे बक्षीस वितरण बक्षीस हे सकल लेवा महिला मंडळ भुसावळ यांच्या उपध्यक्ष सौ प्रभा पाटील आणि सचीव सौ राजश्री कोलते यांच्या कडुन देण्यात आली
आणि टोमणे उखाणे ही कल्पना खजिनदार सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर सौ स्वाती भोळे यांची होती सहजच घेतलेल्या टोमणे उखाणे मध्ये सर्व महिलांनी भरभरून प्रतिसाद देत मज्जा केली आणि संपूर्ण मैफीलीत हास्यांचे फवारे उडाले .
यावेळी प्रमुख अतिथी डॉ दिप्ती चौधरी आणी प्रतिक्षा मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे व सकल लेवा महिला मंडळं भुसावळ कार्यकारणी टिम यांच्या हातुन गणेश वंदना व दिपप्रज्वलन करण्यात आले अध्यक्ष मंगला पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावन केली . तर मुख्य अतिथी डॉ दिप्ती चौधरी यांनी महिलांनी आपल्या आरोग्या विषयी कशी काळजी घ्यायची यावर उपस्थित महिलांना टिप्स दिल्या तर प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी सुद्धा महिलांनी आरोग्य व आहारा विषयी कशी निगा राखावी याबाबत माहीती दिली व्यायाम शरिराला किती महत्वाचा आहे याबाबत सौ कावेरी चौधरी आणि वर्षा लोखंडे यांनी माहिती दिली .

कार्यक्रमाच्सुचेत्रसंचालन आणि लकी ड्रॉ कुपन चिठ्ठी लिहिण्याचे काम बहिणाई ब्रिगेडच्या अध्यक्षा व सकल लेवा महिला मंडळाच्या कार्यकारणी सदस्या सौ मनिषा पाटील व आणि वैशाली चौधरी यांनी केले . तसेच हळंदी कुंकु व वाण वाटप सौ किरण जावळे सौ कल्पना शिंदे व सौ वैशाली पाटील यांनी धुरा सांभाळली
कार्यक्रमाच्या वेळी सौ सिमा पाटील व सौ मंगला पाटील सौ भाग्यश्री भंगाळे यांना सन्मानीत करण्यात आले
तसेच अ.भा. लेवा परिदार युवक महासंघ प्रणीत बहिणाई ब्रिगेड महीला मंडळ याचे जिल्हा अध्यक्ष पद मिळाले म्हणुन सौ स्वाती भोळे व भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसा विभाग भुसावळ यांच्या कोषाध्यक्ष सौ आरती चौधरी यांना सन्मानित करण्यात आले

हळंदी कुंकु कायक्रमाची समाप्ती छान कचोरी खाउन करण्यात आली अशा प्रकारे सकल लेवा महिला मंडळ भुसावळ यांचा दुसरा हळदी कुंकु कार्यक्रम पार पडला भरभरून सहकार्य केले म्हणुन सर्वांचे आभार कोषाध्यक्ष स्वाती भोळे यांनी व्यक्त केले .