भुसावळ – प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नवी अमरावती ते वीर स्थानकादरम्यान विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

नवी अमरावती ते वीर विशेष अनारक्षित ट्रेन (2 फेऱ्या)
•गाडी क्रमांक 01101 विशेष अनारक्षित गाडी नवी अमरावती स्थानकावरून 06 फेब्रुवारी 2025 रोजी 15.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 7.45 वाजता वीर स्थानकावर पोहोचेल.
•गाडी क्रमांक 01102 विशेष अनारक्षित गाडी वीर स्थानकावरून 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 22.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.30 वाजता नवी अमरावती स्थानकावर पोहोचेल.
थांबे: बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा.
संरचना: 16 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.
अधिक माहितीसाठी या विशेष गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रक व थांब्यांची माहिती मिळवण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES मोबाईल अॅप डाउनलोड करा.


