भुसावळ : शहरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, कोटिंग असलेले डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर आदीचा वापर तसेच विक्री, साठा, उत्पादन व वितरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पालिका प्रशासनाच्या पथकाने बाजारातील तब्बल २०० लोडगाड्या ਰ छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून चार किलो प्लास्टिक जप्त केले. या दुकानदारांना व लोटगाड्या धारकांना समज दिली.

पालिकेच्या पथकाने मुख्य बाजारपेठेतून सुरुवात केली आहे. रस्त्यावर फळे, भाज्या तसेच किरकोळ विक्रेते यांना समज देण्यात आली. हातगाड्यावर व्यावसायिकांनाही समज देण्यात आली. पथकाने संपूर्ण बाजारपेठ परिसर पिंजून काढला.
ज्या होलसेल विक्रेत्यांकडून बाजारामध्ये अवैध प्लास्टिक विक्रीस येतो त्यांच्यावर आता पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. सुरुवातीला छोटया-मोठया व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. पालिका क्षेत्रामध्ये चहा विक्रेत्यांद्वारे चहाकरिता छोटे कप वापरण्यात येतात. या कपाला आतील भागात प्लास्टिकचे पातळ वेष्टन असल्यामुळे या कप्समध्ये गरम चहा टाकल्यामुळे आतील मायक्रो प्लास्टिक वितळून या मायक्रो प्लास्टिकचे लाखो कण पोटात जातात त्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तसेच चहा, ज्युस, लस्सी, पाणी आदीकरिता प्लास्टिकचे पातळ वेष्टन असलेल्या कागदी कपमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होत असून, यामुळे नालेही तुल्याचे चित्र आहे
शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनी याची नोंद घेऊन शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर, विक्री, साठा, उत्पादन व वितरण संपूर्णपणे बंद करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. कॅरीबॅग मध्य प्रदेशातून भुसावळात येतात. त्यातून दररोज किमान २०० किलो कॅरीबॅगचा वापर होतो. पालिका शहरात दररोज स्वच्छता करते. मात्र, प्लास्टिक कॅरीबॅगचा प्रचंड वापर होत असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचतात. एकल प्लास्टिक उत्पादने, वापर व विक्रीवर केंद्राने बंदी घातली.
दरम्यान, बंदी घातलेल्या ३ वस्तूंमध्ये प्लास्टिक कप, ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, स्टिरर्स, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टि अथवा पीव्हीसीपासून बनवलेले बॅनरवरसुद्धा बंदी घातली आहे. या वस्तू शहरात विक्री होतात.
प्लास्टिक वापरावर नियमित कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी समज देण्यात आली व चार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. यानंतरही प्लास्टिकचा वापर होत असेल तर निश्चितच दंडात्मक कारवाया करण्यात येतील. असे आरोग्य अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले .


