प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळा २०२५ दरम्यान प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीची सोय करण्यासाठी रेल्वे नांदेड ते पटना आणि काचीगुडा ते पटना दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे. या विशेष गाड्यांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

नांदेड ते पटना कुंभमेळा विशेष (०२ सेवा)
गाड़ी क्रमांक 07721 विशेष दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी नांदेड येथून 23.00 वाजता सुटेल आणि पटना येथे तिसऱ्या दिवशी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07722 विशेष दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी पटना येथून 15.30 वाजता सुटेल आणि नांदेड येथे तिसऱ्या दिवशी 04.30 वाजता पोहोचेल.
थांबे -: पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपुर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर आणि आरा.
संरचना: दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १६ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी व २ गार्ड्स ब्रेक व्हॅन.
काचीगुडा ते पटना कुंभमेळा विशेष (०२ सेवा)
गाडी क्रमांक 07725 विशेष दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी काचीगुडा येथून 16:45 वाजता सुटेल आणि पटना येथे तिसऱ्या दिवशी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07726 विशेष दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी पटना येथून 11:30 वाजता सुटेल आणि काचीगुडा येथे तिसऱ्या दिवशी 07:00 वाजता पोहोचेल.
थांबे-: निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर आणि आरा.
संरचना: २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ७ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी व १ गार्ड्स ब्रेक व्हॅन.
प्रवाशांना या गाड्यांच्या वेळापत्रक व थांब्यांची अधिक माहिती घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट देण्याचे किंवा NTES अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात येते.


