भुसावळ ते शेगांव पालखीचे हाेणार ४ जानेवारी राेजी प्रस्थान ;

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे येत्या दि.४ जानेवारी रोजी भुसावळ ते श्री क्षेत्र शेगांव पालखीचे प्रस्थान ‘गण गण गणात बाेते’च्या गजरात सकाळी ६ वाजता हाेणार आहे.
प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा हाेईल. तद्नंतर पायी वारीस प्रारंभ हाेईल. दरम्यान वारीचा मुक्काम दि. ४ राेजी मुक्ताईनगर, ५ मलकापूर, ६ नांदुरा, ७ अन्नकुटी व दि. ८ राेजी पालखी श्री क्षेत्र शेगांव ला पाेहाेचेल.
तरी ज्या भाविकांना पायीवारीत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी जामनेर रोड वरील गजानन महाराज मंदिर सेवेकरी यांच्याशी संपर्क करीता दि.३ जानेवारी पर्यंत आॅनलाईन https://www.shrigajananmaharajdevsthanbsl.org यावर नाेंदणी करावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.