चाळीसगाव-भुसावळ मध्य रेल महिला कल्याण संघटन अध्यक्षा तसेच मध्य रेल्वेच्या डीआरएम श्रीमती इती पांडे यांनी नुकतीच अंधशाळेला सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान श्रीमती इति पांडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मुलांना प्रोत्साहन देऊन जीवनात जिद्द, मेहनत व चिकाटी या त्रिसूत्रने यशस्वी व्हा असा कानमंत्र दिला. तसेच शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना व स्टॉफला मिष्ठांन्न भोजन दिले. सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट, फळे व चिक्कीचे वाटप केले.
अंधशाळेचे मुख्याध्यापक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून श्रीमती इति पांडे यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन यथोचित सत्कार केला. कार्यक्रमास मध्य रेल महिला कल्याण संघटन भुसावळच्य सचिव श्रीमती कश्यपी अग्रवाल, कोषाध्यक्ष श्रीमती पूजा अर्थित बुधाडे, तसेच श्रीमती तेजस्विनी धावडे , श्रीमती डॉ. अंबुसकर मॅडम, जितेंद्र पाटील, वैभव पत्राहळ, तसेच चाळीसगाव येथील मुख्य स्टेशन प्रबंधक बडगुजर , या मान्यवरांचा देखील शाळेचे शिक्षक अभय कसबे , ज्ञानेश्वर आल्हाटे, अशोक पाटील, आनंद गायकवाड, संजय घोडेराव, राजवल्ली जमादार, शंकर देशमुख, राजेंद्र राठोड, भगवान रील, मनोज पारधी, श्रीमती कल्पना पारधी, श्रीमती राजश्री मगर व विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर श्रीमती इती पांडे यांनी विद्यार्थ्यांचे निवासस्थान, गणवेश, तसेच शाळेचे टॉयलेट बाथरूम किचन , भोजन व्यवस्था व मैदानाची स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले त्याबद्दल मुख्याध्यापक श्री. सचिन सोनवणे व सर्व स्टाफचे कौतुक केले.