देविदास फालक वृद्धाश्रमाचा प्रारंभ ; वास्तुशांती, श्री दत्तयाग सह त्रिपदी उत्साहात

भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथिल जामनेर राेडवरील मीरगव्हाण क्षेत्रात
स्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था संचालीत कै.देविदास फालक वानप्रस्थाश्रम तथा
वृद्धाश्रमाच्या प्रारंभा निमित्त
दि.२४ रोजी श्री दत्तयाग व दि. राेजी २५ वास्तुशांती तसेच
प.पू . नाना महाराज तराणेकर त्रिपदी मंडळाचे वतीने त्रिपदी भजनांचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात सादर करण्यात आला.
यावेळी संस्थेला सढळ हाताने देणगी देणारे देणगीदार देवदत्त पेंडसे नागपुर, माधवी संत नाशिक, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ जळगांवचे विश्वासराव कुळकर्णी, विलासराव देशमुख, नंदकुमार जाखोटिया, संस्थेचे अध्यक्ष महेश फालक उपस्थित होते . संस्था सचिव गणेश वढवेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती दिली . दरम्यान वृद्धाश्रमात गरजू व्यक्तींना सशुल्क नियमानुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी गरजू ज्येष्ठ नागरिकांनी वृद्धाश्रमात प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले. धार्मिक विधीचे पौरोहित्य पावडे गुरुजी व सहकारी यांनी केले. यावेळी अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे विलासराव बेंद्रे, मोतीराम गिरनारे, प्रद्युम्न गाडगीळ, श्रीराम मंदिराच्या श्रीमती सरीता चौक, त्रिपदी मंडळाच्या सरीताताई देशपांडे, रवी जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र गोडबोले, चंद्रकांत नेवे, राजेश कोष्टी, संजय बोचरे, प्रणव वढवेकर, संजय एकलारकर, यशोधन फालक, लक्ष्मी वढवेकर , वैशाली एकलारकर , प्रतिभा वढवेकर, सौ नेवे, सौ बोचरे, मृणाल गाडगीळ यांनी परिश्रम घेतले.

(फोटो कॕप्शन)
कै. देविदास फालक वृद्धाश्रम प्रारंभा प्रसंगी संस्था सचिव गणेश वढवेकर प्रास्ताविक करताना. मंचावर उपस्थित (डावीकडून ) माधवी संत, विश्वासराव कुळकर्णी, विलासराव देशमुख, संस्थाध्यक्ष महेश फालक, देवदत्त पेंडसे आणि नंदकुमार जाखेटिया.