भुसावळ – मध्य रेल्वे महाप्रबंधकांनी ६९ व्या रेल्वे सप्ताहात विशिष्ट रेल सेवा पुरस्काराचे दि. २४ रोजी मुंबई येथे वितरण केले. त्यात रेल्वेच्या भुसावळ विभागाला कार्यक्षमता पुरस्कार प्रदान करण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांनी हे शिल्ड स्वीकारले.
विभागातील सर्व विभागांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संपूर्ण कार्यक्षमता पुरस्कार प्राप्त झाले आहे.
इति पांडे यांना महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल तर भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही वैयक्तिक पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी संबंधित विभागाच्या शाखा अधिकारी यांच्यासह संरक्षा शिल्ड, विद्युत शिल्ड, सिग्नल आणि टेलिकॉम शिल्ड, कार्मिक शिल्ड, सुरक्षा शिल्ड, भांडार व्यवस्था शिल्ड (भुसावळ आणि पुणे विभाग सह संयुक्तपणे), पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड (सोलापूर आणि भुसावळ विभाग सह संयुक्तपणे) स्वीकारले.
यासोबतच २०२४ साठी भुसावळ विभागातील चार अधिकारी आणि १३ कर्मचारी उत्कृष्ट सेवांकरिता सन्मानित करण्यात आले.



