जळगाव – डिसेंबरअखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेची रक्कम जमा होईल, असे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर बुधवार, 25 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. महिलांमध्ये आनंद व्यक्त होत असून जिल्ह्यात अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.

लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी अनेक दिवस वाट पहावी लागली होती. आता जळगाव जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. ही बातमी ऐकून महिला आनंदित झाल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे आगाऊ दिले गेले होते, पण नंतरचा डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठी महिलांना थांबावे लागले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, येत्या आठवडाभरात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत.


