भुसावळातील ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये क्रिडा स्पर्धा संपन्न ; सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा शनिवार दि २१ रोजी उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळातील डॉ.तुषार पाटील हे होते. यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक,चेअरमन महेश फालक,सेक्रेटरी विष्णू चौधरी, प्रिंसीपल निना कटलर व्यासपीठावर उपस्थित होते.
मानवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून व क्रिडा ज्योत पेटवून तसेच क्रिडा फ्लॅग हॉस्टीग करुण स्पर्धेला सुरुवात झाली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. यात ड्रिल,कॅरल साँग,क्रीप मेकिंग तसेच मार्च पास,मशाल ज्योत सादर केले. शाळेतील नर्सरी ते दहावी पर्यंतच्या एक हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला होता. प्रसंगी रनिंग,हॉपिंग,हडल्स रनींग,फ्रॉग जंप,कोन रेस अशा विवीध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेऊन त्यांना शील्ड व सर्टिफिकेट पुरस्कार देण्यात आले, तसेच पालकांसाठी रनिंग स्पर्धा घेण्यात आली व त्यांना पुरस्कार देण्यात आले.
या वेळी प्रिंसीपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की मुलांनी मोबाईल ऐवजी अभ्यासाकडे व क्रीडा स्पर्धा कडे लक्ष घालावे, आपले माईंड फ्रेश रहावे म्हणून किमान रोज एक तास तरी खेळले पाहिजे. सकाळी लवकर उठून योगा देखील केला पाहिजे.
प्रसंगी व्हॉईस प्रिंसीपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर,
स्कुलच्या ओएस सविता सहजे,राहूल नेमाडे, क्रिडा शिक्षक अकबर खान,विजय संकत,अर्जुन सनस,बॉबी पवार,राहूल सोनवणे,अनिता कोळी यांच्यासह इतर शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.सुत्रसंचलन मोहम्मद कय्युम शेख,प्रिया रायण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रिन्सिपल नीना कटलर यांनी मानले.

( फोटो ओळ – भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा शनिवारी झाल्या यावेळी या स्पर्धेत जिंकलेल्या विद्यार्थिनींना पुरस्कार देताना शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर.)