भुसावळात श्रीमद् भगवद्गीता पठण स्पर्धा संपन्न ; सकल लेवा महिला मंडळ व एएसपी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ – सकल लेवा महिला मंडळ भुसावळ व एएसपी फाउंडेशन भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने गीता जयंतीनिमित्त श्रीमद् भगवद्गीता पठण स्पर्धा आज दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी भागीरथी प्राथमिक विद्यालय भुसावळ येथे आयोजित करण्यात आले,

या जिल्हास्तरीय स्पर्धेत बोदवड जामनेर यावल व भुसावळ तालुक्यातील शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी होते , ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली तिघ गटांना मिळून नऊ बक्षीस देण्यात आले, त्यात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक या तिन्ही गटात बक्षीस स्वरूपात ट्रॉफी सर्टिफिकेट व रोख रक्कम देण्यात आली, त्यात प्रथम गटात पहिले बक्षीस स्वराज पाटील दुसऱे बक्षीस अरुण्या मोरे तिसरे बक्षीस नमित महाजन तर द्वितीय गटात प्रथम क्रमांक मिताली भंगाळे द्वितीय टीना वारके तृतीय भाविका भंगाळे व तृतीय गटात प्रथम क्रमांक विजयसिंग पाटील द्वितीय तीर्थराज फिरके तृतीय तोष्णी चौधरी यांनी मिळवले,

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ह भ प दीपक महाराज शेळगावकर व ह भ प प्रल्हाद ढाके महाराज यांनी योगदान दिले , बक्षीस वाटप प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनीताई सावकारे व ए एस पी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत पाटील व सौ प्रतीक्षा पाटील , बिसारा रनर्स ग्रुपच्या उपाध्यक्षा डॉ.नीलिमाताई नेहेते यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ.मंगलाताई पाटील यांनी केले , मंडळाच्या उपाध्यक्षा प्रभाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षकांचा परिचय सहसचिव कावेरी चौधरी व मेघा कुरकुरे यांनी केला . विजेते स्पर्धक यादी वाचन मंडळाच्या खजिनदार स्वातीताई भोळे व वैशाली धांडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा लोखंडे व संध्या भोळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन सचिव सौ. राजश्री ताई कोलते यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सकल लेवा महिला मंडळ भुसावळ कमिटी मेंबर्सने परिश्रम घेतले.