भुसावळ,
राज्यस्तरीय लेवा पाटीदार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा आज, रविवारी (८ डिसेंबर ) रोजी संतोषी माता वहुउद्देशिय हॉल, मातृभुमी चौक, येथे आयोजित करण्यात आला आहे. भुसावळ येथील श्री सद्गुरू झेंडूजी महाराज (बेळीकर) लेवा पाटीदार समाज संस्था व महालक्ष्मी ग्रुप भुसावळ यांनी मेळाव्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मेळाव्याचे यंदा ९ वे वर्ष आहे.
समाजाच्या परिचयाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आणि विवाहासारखा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मागील दहा वर्षांपासून वधु-वर परिचय मेळावा घेण्यात येत आहे. मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो विवाह जुळले आहेत. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांना परिचय पुस्तिका देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात चालू वर्षात विशेष प्राविण्य संपादन केलेल्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात येणार आहे. सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनेश भंगाळे यांनी केले आहे.

मान्यवरांची असेल उपस्थिती:
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती. रक्षाताई खडसे यांचा विशेष सत्कार समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. माजी मंत्री विधानपरिषदचे आमदार मा. श्री. एकनाथरावजी खडसे, भुसावळ विधानसभेचे आमदार मा.श्री. संजयभाऊ सावकारे, कुटुंबनायक मा. श्री. ललितकुमार पाटील, मा. श्री. सुधीर पाटील, मा.श्री. वासुदेव इंगळे, मा. श्री. रमाकांत भारंबे, मा. श्री. जगदीश भंगाळे, मा.श्री. विनोद वारके, मा. श्री. हेमंत मंगाळे, मा. श्री. उज्वल चौधरी, मा. श्री. रघुनाथ रोटे, मा. श्री. पुरुषोतम भारंबे, मा.श्री. हरी राणे, मा.श्री. गिरधर राणे व समाजबांधव उपस्थित असतील.


