भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील नाहाटा काॅलेज चाैफुली जवळील श्री खंडोबा मंदिरात शनिवारी चंपाषष्टी निमित्त भंडारा उधळीत ‘यळकाेट यळकाेट जय मल्हार’ च्या गजरात भाविकांनी श्री खंडाेबा रायाचे उत्साहपूर्वक वातावरणात दर्शन घेतले.
दरम्यान ७ रोजी प्रारंभी सकाळी श्री खंडोबास अभिषेक पूजा व वांग्याचे भरीत, भाकरीचा नैवेद्य दाखवित भाविकांनी खंडाेबारायाचे आशीर्वाद घेतले.सकाळ पासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या .
तसेच भाविकांनी घराेघरी आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत दिवटी बुधलीसह सवाद्य खोबरं तळी उचलीत भंडारा उधळला.




