भुसावळ तालुक्यातील एका शेतात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ :

भुसावळ-भुसावळ तालुक्यातील एका शेतात अंदाजे ३० वर्षीय अनोळखी तरूणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

भुसावळ शिवारातील नामदेव भोळे यांच्या शेता शेजारी एका अनोळखी अंदाजे ३० वर्षीय तरूणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती भुसावळ तालुका पोलीसांना मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मात्र यावेळी मयताची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.

पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह भुसावळातील ट्रामा केअर सेंटर येथे रवाना करण्यात आला असून  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे हे करीत आहे.