भुसावळ – एक हजार रुपये न दिल्याच्या राग आल्याने तरुणाला कोयता दाखवत त्याच्या खिशातील दीड हजार रुपये बळजबरीने काढून घेतले जामनेर रोडवरील विकास कॉलनी येथे दिनांक 28 रोजी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली या प्रकरणी संशयित हेमंत जगदीश पैठणकर याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

तुषार माणिक चौधरी रा. विकास कॉलनी भुसावळ याला गुरुवारी संशयित हेमंत पैठणकर याने इर्टीका वाहन व एक हजार रुपये मागितले ते देण्यास त्याने नकार दिल्याचा रागातून संशयिताने कोयत्याचा धाक दाखवून चौधरीच्या खिशातील दीड हजार रुपये जबरीने हिसकावले तसेच तुषार चौधरींची पत्नी भावना व आई रेखाबाई यांनी शिवीगाळ केली याप्रकरणी तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजीव सांगळे करीत आहेत .


