भुसावळ – शहरात काही दिवसांपासून गारठयात वाढ झाली आहे गुरुवारी रात्रीच किमान तापमान 12.8 अंशापर्यंत घसरले तर शुक्रवारचे दिवसभराचे कमाल तापमान 28° वर होते यामुळे दिवसाच्या वेळीही गारवा जाणवत होता गेल्या आठवड्यात शहराचे तापमान 14 अंशावर स्थिरावले होते किमान तापमानात घट होऊन आता पारा 12.8 अंशावर घसरला आहे शहरात आगामी काळातही थंडीची हुडहुडी कायम राहणार आहे

शहराच्या किमान तापमानात गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने चढ-उतार होत आहे तर गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान 14 अंशावर तर कमाल तापमान 29 अशा वर होते मात्र थंडीचे प्रमाण वाढले आहे वाऱ्याचा वेग वाढल्याने दिवसाही गारठा जाणवत आहे थंडीचे प्रमाण वाढले असून शहरात आगामी काळातही थंडी कायम राहणार आहे शहरात पहाटे साडेतीन ते सहा वाजेपर्यंत किमान तापमान निश्चित असते शुक्रवारी शहराचे किमान तापमान 12.8 होते केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजेच्या नोंदीतून हा निष्कर्ष काढला आहे कमाल व किमान तापमानात आता सातत्याने कमी अधिक प्रमाणात वाढ व घसरनही होत आहे


