भुसावळात उद्या केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विशेष उपस्थितीत महायुतीची महारॅली ;

भुसावळ – भारतीय जनता पार्टी महायुतीचे भुसावळ विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विशेष उपस्थितीत उद्या दिनांक 18 नोव्हेंबर सोमवार रोजी भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थानिक दर्डा भवन, जामनेर रोड,भुसावळ येथून सकाळी १० वाजता रॅलीस प्रारंभ होणार असून या महारॅलीस भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परिक्षित बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे,संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी केले आहे.