भुसावळ – भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली ललित मराठे-पाटील यांच्यासह त्यांचे पती ललित मराठे यांनी शनिवारी यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. यावेळी आमदार संजयभाऊ सावकारे व पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार संजय सावकारे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी मराठे-पाटील दाम्पत्याने दिली.

आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत आमदार सावकारे यांच्या विजयासाठी निश्चित प्रयत्न करणार असून संजुभाऊ सावकारे यांचाच विजय निश्चित होईल, असा विश्वास यावेळी मराठे पाटील दाम्पत्याने व्यक्त केला.
शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका वैशाली ललित मराठे-पाटील यांच्यासह त्यांचे पती व भुसावळ नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती ललित मराठे यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला. यावेळी उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, पिंटू कोठारी, परीक्षीत बर्हाटे, अजय भोळे, परिक्षीत बर्हाटे, संदिप सुरवाडे , दिनेश नेमाडे, रमाशंकर दुबे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


