भुसावळ – येथील आयुर्माने केंद्रीय विद्यालयात बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य नंदेश्वर यांच्या हस्ते झाली यावेळी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्राचार्य नंदेश्वर मुख्याध्यापक सुरेश नरहिरे नितीन कुमार उपाध्याय शिक्षिका संध्या परदेशी यांनी दिपप्रज्वलन केले . यावेळी आधारभूत स्तराच्या विद्यार्थ्यांनी’ चंदा चमके चम चम या सुंदर गीतावर नृत्य सादर केले त्यानंतर इयत्ता चौथीचा विद्यार्थी आदित्य सुरवाडे यांनी हिंदी भाषेमध्ये बाल दिनाचे महत्त्व विशद केले आरंभीक स्तराच्या विद्यार्थ्यांनी तू धूप हे या गीतावर नृत्य सादर करून बालकांच्या मूलभूत अधिकारांवर प्रकाश टाकला इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी श्रावस्ती सपकाळे हिने बाल दिनावर इंग्रजीतून भाषण केले त्यानंतर इयत्ता पहिलीचे विद्यार्थ्यांनी अश्वती सपकाळ व इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी प्रणिती उपाध्याय यांनी कथक नृत्य सादर केले तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रम विद्यालयाच्या संगीत शिक्षिका रजनी पवार यांच्या मार्गदर्शनात पार पडले आभार संध्या परदेशी यांनी मानले .



