भुसावळात कार्तिकी एकादशीनिमित्त दिंडीचे बागुल परीवारातर्फे स्वागत –



भुसावळ : कार्तिकी एकादशी देवशयनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील विठ्ठल मंदिरातील वारकरी संप्रदायातर्फे आज मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी काढण्यात आलेल्या दिंडीचे बागुल परीवारातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी अनिल बागुल यांनी पुष्पहार घालून पंचारती औक्षण करीत दिंडीतील वारकर्‍यांचे स्वागत केले .
दिंडीत सहभागी वारकऱ्याना प्रसाद वाटप करण्यात आला. शतकाकडे वाटचाल करणार्‍या दिंडीच्या स्वागताची धार्मिक परंपरा , आजही बागुल कुटुंब जोपासत आहे .