भुसावळात विधानसभा निवडणूकीच्या गृह मतदानास आजपासून सुरुवात ;

भुसावळ – भुसावळ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी दि १२/११/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता गृह मतदानाला सुरुवात झाली . गृह मतदानासाठी १७ टीम नेमण्यात आल्या होत्या . प्रत्येक टीम मध्ये सूक्ष्म निरीक्षक , संपर्क अधिकारी , BLO , व्हीडीओग्राफार आणि पोलीस कर्मचारी होते.
एकूण २०१ गृह मतदार होते त्यापैकी ८५ पेक्षा अधिक वय असलेले मतदार १६७ आहेत. तर दिव्यांग मतदार ३४ आहेत. त्यापैकी आज पहिल्या भेटीत ८५ पेक्षा अधिक वय असलेल्या १५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर एकून २९ दीव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .

उर्वरित मतदानासाठी दुसऱ्या भेटीत म्हणजे उद्या दि १३/११/२०२४ ला मतदान होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी कळविले त्यावेळी . सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन पानझाडे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून सर्व मतदानाची प्रक्रिया पार पाडली