भारताचे विद्यापीठ “रमाई महाकाव्यचे जळगावात काव्यग्रंथाचे अनौपचारिक प्रकाशन ;

जळगाव – भारताचे विद्यापीठ “रमाई महाकाव्य ” चे संपादन नांदेडचे प्रा डाॅ अशोककुमार दवणे यांनी केलेय. महाराष्ट्र आणि भारतभरातील मराठी कवी/कवयित्री यांच्या पाचशे कवितांचे संपादन हा मराठी चरित्र कवितेतील अमोल असा ठेवा आहे.विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचरणी असलेल्या रमाई माऊलीचे अपार कष्टही डाॅ आंबेडकर यांचे पाठीशी होते.आदर्श रमाई माऊली ही डाॅ आंबेडकर यांचेसाठी संजीवनीच होती. या महान माऊलीस विनम्र अभिवादन!
आज महाराष्ट्रभर/भारतभर या काव्यग्रंथाचे प्रकाशन आपल्या कुटुंबाच्या जडणघडणीसाठी आणि डॉ. आंबेडकरांचा विचार पेरणीसाठी आयुष्य वेचणा-या माऊल्यांच्या हस्ते या काव्यग्रंथाचे अनौपचारिक प्रकाशन आंबेडकरी समाजाच्या घरा-घरात संपन्न होत आहे.

जळगावी आंबेडकरी कवयित्री उषा हिंगोणेकर आणि त्यांच्या मातोश्री सुमन नामदेव सपकाळे यांचे हस्ते कौटुंबिक वातावरणात संपन्न झाले.
आंबेडकरी समाजातील प्रत्येक घरात ही रमाईमाऊलीची
कर्तृत्वगाथा घरी असावीच.

शब्ददान प्रकाशन नांदेड
मूल्य:800/-रूपये
संपर्कः प्रा.डाॅ.अशोक दवणे
मो.नं.9890381958