भुसावळ – भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभाग भुसावळच्यावतीने आयोजित केलेला विधवा विधुर घटस्फोटीत शेतकरी प्रौढ यांचा मेळावा व सूची प्रकाशन संतोषीमाता हॉल येथे घेण्यात आले
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर लेवा समाजातील लोकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंबनायक ललित दादा पाटील होते.
सर्वप्रथम भुसावळ शाखा अध्यक्ष सुहास चौधरी यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी हा मेळावा समाजाच्या दृष्टीने आवश्यक असून जास्तीत जास्त विवाह यातून जोडले जातील असा आमचा प्रयत्न असतो. तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
यानंतर सूची प्रकाशानाचा कार्यक्रम झाला यावेळेस व्यासपीठावर कुटुंबनायक ललित पाटील माजी आमदार दिलीप भोळे उपस्थित होते
उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी आपल्या भाषणात वैवाहिक जीवनात तडजोड केली केली तरच वैवाहिक आयुष्य सुखी होतं तसंच आई-वडिलांनी मुलांच्या संसारात कमीत कमी हस्तक्षेप केला तर समस्या कमी होतील. असे सांगितले
माजी आमदार दिलीप भोळे यांनी भोरगांव लेवा पंचायत अतिशय उपयुक्त असा सामाजिक उपक्रम घेत असून, हा कार्यक्रम पुनर्विवाहासाठी मेळावा कोठेही होत नाही म्हणून अभिनंदन करून कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
शेवटी आभार प्रदर्शन सचिव सुभाष भंगाळे यांनी अतिशय सुंदर शब्दात केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संध्या भोळे यांनी अतिशय ओघवत्या भाषेत केले.
या मेळाव्याला भुसावळ व्यतिरिक्त बाहेर गावचे जळगाव नाशिक मलकापूर ठाणे पुणे गुजरात मधील वापी येथून पालक व मुलेमुली उपस्थित होते.
एकुण 38 मुलामुलींनी परिचय दिला पैकी 32 मुले व 6 मुली होत्या.
एकुण 368 लोकांची उपस्थिती होती.
या प्रसंगी भोरगाव भुसावळ विभागाचे चेतन पाटील, महेश फालक, मंगला पाटील, किरण चौधरी, आर. जी. चौधरी, अरूण चौधरी, धीरज पाटील, चंद्रकांत चौधरी,अनिल वारके, संजय पाटील, उपस्थित होते.
जळगावहून अशोक पाटील, राजू खडके,ब-हाटे हजर होते.
भुसावळमधील प्रतिष्ठित गोविंदा ढाके, दिनेश भंगाळे, जगदीश फिरके, डॉ. मृणाल पाटील, दिपाली ब-हाटे,सुनंदा चौधरी, उल्हास महाजन, मनोज जावळे उपस्थित होते.



