भुसावळ शहरात उद्यापासून बॉक्सिंग टूर्नामेंट : ऑलम्पिक विजेत्या एम.सी. मेरी कॉम यांची उपस्थिती –

भुसावळ – भुसावळ शहरातील कोरोनेशन क्लबमध्ये आई फाऊंडेशन अंतर्गत छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी आयोजीत राणी लक्ष्मीबाई पहिलीच मुली व महिलांसाठी ऑल इंडीया बॉक्सिंग टूर्नामेंटचे आयोजन 6 ते 10 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे.

या टूर्नामेंटला विशेष उपस्थिती म्हणून सहा वेळेस विश्वविजेती, ऑलंम्पिक विजेत्या ठरलेल्या एम.सी. मेरी कॉम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यांची शहरातून बुधवार, 6 रोजी सकाळी 10 वाजता अष्टभुजा देवी मंदिर ते कोरोनेशन क्लब (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान) येथेपर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे प्रशिक्षक बाळा मोरे यांनी कळवले आहे.