नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची भाऊबीज मातोश्री आनंदाश्रम या ठिकाणी दिनांक 3नोव्हेंबर 2024 रोजी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली..
दिवाळीच्या आनंदपर्वात सर्व कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवारासोबत दिवाळी साजरी करत असताना वृद्धाश्रमातील वृद्ध मात्र एकटेच आपल्या सुखदुःखांना कवटाळून दिवाळी साजरी करत असतात..
तर अशा या वृद्धांच्या मनातील अंधकार दूर सारून त्यांच्या मनात प्रेमाची आणि सौख्याची फुलवात लावण्याचे अतिशय प्रेरणादायी काम येथील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेमार्फत करण्यात आले..

यावेळी तेथील वृद्ध पुरुषांना मिठाई आणि टॉवेलचे वाटप करण्यात आले. एकाकी जीवन जगत असताना त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करून त्यांचं मन प्रसन्न करण्याचं कार्य नारीशक्ती तर्फे करण्यात आले..
यावेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ. मनीषा पाटील प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया, सहप्रमुख प्रवीण देशमुख, किरण तोडकरी ,सौ मंजुषा अडावदकर, आशा मौर्य, हर्षा गुजराती ,श्रावणी पाटील, सुमेरसिंग पाटील आदी उपस्थित होते.
परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे



