भुसावळात महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांनी भरला उमेदवारी अर्ज

रथावर स्वार होऊन सावकारे यांची भव्य नामांकन रॅली*

* केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची होती उपस्थिती !

* भुसावळात मोठे शक्ती प्रदर्शन…. रॅलीत हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती !


भुसावळ – भाजपाचे उमेदवार संजय सावकारे यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीला आज २८ रोजी सकाळी जामनेर रोडवरील दर्डा भवनापासून विराट शक्ती प्रदर्शन रॅलीला सुरूवात झाली. शहरासह ग्रामीण भागातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.


सजवलेल्या रथावर भाजपचे नेते गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, महायुतीचे उमेदवार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी आदी उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांनी २८ रोजी प्रांत कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरीफ शेख, उमेश नेमाडे, समाधान पवार, विकास वलकर उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या नामांकनापूर्वी शहरात शक्ती प्रदर्शन रॅलीने सुरूवात झाली. अग्रभागी भजनी मंडळ व त्यानंतर ढोल-ताशांचा गजर होता. माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा उत्साहात ढोल-ताशांच्या गजर सुरू होता. तर महायुतीतील विविध घटक पक्षांचे ध्वज घेवून कार्यकर्तेही या रॅलीत सहभागी झाले होते.