भुसावळातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एकास अटक

भुसावळ – 51 वर्षीय प्रौढाने दहा वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना एका भागात 17 रोजी दुपारी तीन ते साडेतीन दरम्यान घडली. याप्रकरणी संशयीत राजेंद्र रामचंद्र भावसार (51, जामनेर रोड, भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

संशयीताला अटक
दहा वर्षाची पीडीता आजीसोबत फोटोफ्रेमला काच लावण्यासाठी संशयीतांच्या दुकानात गेल्यानंतर पीडीतेने त्याने गोदामात नेत विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरानंतर मुलीने तीन दिवसानंतर झालेला प्रकार हा घरी सांगितला, याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात भावसारविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीताला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहेत.