दिपनगर प्रकल्पात प्रशासनाने स्थानिक ठेकदाराला वंचित ठेऊन परप्रांतियांना ठेका देण्याचे षडयंत्र –

दीपनगर:- येथील 660 मेगा वट प्रकल्पात स्थानिक ठेकेदारांना वंचित ठेवून छोटी कामे एकत्रीत करुन मोठी निविदा परप्रांतीय करिता बनविण्यात आली.
परप्रांतीय प्रकल्पात कामे घेतील तर परप्रांतीय मजूर आणतील त्यामूळे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार नाही आणि त्याच्यावर उपासमारीची वेळ येईल.
यासबंधी प्रशासनाला वंचित बहुजन कंत्राटदार संघटना व स्थानिक कंत्राटदार संघटना कडून वेळोवेळी निवेदन देण्यात आली आहे. तरी सुध्दा प्रशासनाने मोठ- मोठ्या निविदा काढून स्थानिक कांत्रादारावर अन्याय करीत. याचा निषेध करून स्थानिक ठेकेदार व मजूर यांनी प्रकल्पात काम बंद आंदोलन केले.
आंदोलानाचे नेतृत्व वंचित बहुजन कंत्राटदार संघटनाचे अध्यक्ष प्रकाश सरदार व स्थानिक कंत्राटदार संघटना चे अध्यक्ष उल्हास बोरोले यांनी केले, आंदोलनात स्थानिक कंत्राटदार महेश पिठले, रामचंद्र तायडे,प्रवीण पाटील, राहुल निंबाळकर, प्रकाश तायडे, बालाजी पठाडे,बबुसिंग सनासे, निशांत निकम, विजयकुमार भालेराव, सलमान पठाण, बंटी सरदार, तुळशीराम तायडे , उस्मान पठाण, निलेश कांबळे, संकेत पाटील, गजानन सूर्यवंशी, इत्यादी स्थानिक कंत्राटदार सह इतर स्थानिक बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपास्थित होते.