आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचे भूमिपूजन :

भुसावळ – भुसावळात दि.10 ऑक्टोबर गुरूवार रोजी वसंत टॉकीज समोर सकाळी ११ वाजता भव्य म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परिक्षित बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे यांनी केले आहे.