भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मेंटल ,मोरल आणि सोशियल सायन्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही पाटील उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे देखील उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा. वंदना नेमाडे यांनी गांधीजींचे विचार आणि त्यांचा जीवन प्रवास वरती मार्गदर्शन केले.,….त्यात त्यांनी महात्मा गांधीजींनी केलेले चपारण्य सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ इ.बदल मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. व्ही पाटील यांनी महात्मा गांधीजींचे तत्व सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यावरती प्रकाश टाकुन त्यांच्या विचारांची प्रासंगिता विशद केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संध्या वराडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मेंटल, मोरल आणि सोशल सायन्स असोसिएशन चे समन्वयक प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. साहेबराव राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता भिरूड आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.


