वरणगावला गावठी कट्यासह एकास अटकबस स्थानक चौकात गुन्हा शाखेची कारवाई ;

वरणगाव, –

शहराच्या बस स्थानक चौकातील स्वामी समर्थ व्यापारी सकुलनात राज मोबाईलच्या दुकानात अवैधरित्या गावठी कट्टा बळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाही करीत कट्यासह एकास अटक केली.

याबाबत पोलीस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार असे, गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर बस स्थानक चौकातील राज मोबाईल दुकानाचा संचालक राज उर्फ मनोज सुरेश शिंदे (३९) रा. रामपेठ ह मु शिवराज चौक फुलगाव ता. भुसावळ हा आपल्या दुकानात गैर प्रकारे विना परविना गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती मिळाली.

दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमूख व प्रीतम पाटील यांनी मनोज शिंदे याला बस स्थानक चौकात गाठत त्यांच्या अंगाची तपासणी केली. त्याच्या जवळील पंचवीस हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व आठ हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.

या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पोलीस नाईक श्रीकृष्ण खंडेराव देशमूख नेम . (जळगाव ) यांच्या फिर्यादीनुसार शस्त्र अधिनियम ३/ २५ महा पो अधि क ३७ (१) (३) प्रमाणे मनोज शिदें याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सह फैजादार नागेंद्र तायडे हे करीत आहे.