के नारखेडे महाविद्यालयात तालुका विधी समिती द्वारा कायदेविषयक शिबीर :

भुसावळ –

के नारखेडे महाविद्यालय भुसावळ येथे तालुका विधी समिती व के नारखेडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले समांतर विधी अधिकारी ॲड जास्वंदी भंडारी यांनी ॲन्टी रॅगिंग कायदा व तरतुदी, शिक्षा याविषयी मार्गदर्शन केले व मुलांमुलींकडुन होणारी एक छोटीशी चुक त्यांचे पुर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त करुन शकते हे उदाहरणांसह स्पष्ट केले स्वतः च्या आनंदासाठी केलेली एखादी कृती समोरचे विद्यार्थ्यांचे व स्वतः चे संपूर्ण आयुष्य बदलु शकते म्हणून अश्या कृत्यांपासुन विद्यार्थ्यांनी लांब राहिले पाहिजे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण याबाबत घ्यावयाची काळजी व त्याबद्दल असलेला पोक्सो कायदा याबाबत ॲड योगेश बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले आपल्या सभोवताली जर अश्या घटना घडत असतील तर त्यावर आवाज उठवावा असेही सांगितले तर वाहतुकीचे नियम याविषयी ॲड आय आय खान यांनी प्रश्नोत्तरे घेत मार्गदर्शन केले. विधी सेवा समिती कार्ये याविषयी ॲड कैसर भारमल यांनी मार्गदर्शन केले तसेच ॲड .रायभोले यांनी ही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास अध्यक्ष व उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. जी. श्रीवास होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी सरोदे यांनी तर आभार ॲड जास्वंदी भंडारी यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास संपन्न करण्यासाठी विधी कर्मचारी तुषार वानखेडे ,सतीश पाटील यांनी परिश्रम घेतले.