.

भुसावळ -भुसावळात शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेचा काळ्या फिती लावून शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी स्थानिक रेल्वे स्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आज बुधवार २८ रोजी ११ वाजता निदर्शने देण्यात आली तसेच दोषींवर त्वरित कारवाई व्हावी यासंदर्भात मागणी केली असून याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन दिले .
मालवण येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण दहा महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र हा पुतळा बसविण्याचे काम भाजपा संबंधित व्यक्तीला कामाचा अनुभव नसतानाही दिले. नुकताच परवा हा पुतळा खाली कोसळला. या कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण घटनेत महाराष्ट्राचा अवमान झाल्याने राज्यातील जनतेत संतापाची भावना पसरली आहे. महाविकास आघाडीने राज्य स्तरावर आंदोलन जाहीर केले आहे.
शिवाजी महाराज यांचा पुतळा पडणे हा अवघ्या महाराष्ट्राचा अवमान आहे तरी या घटनेची त्वरित सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी शिवसेना ( उबाठा ) व भुसावळ महाविकास आघाडी तर्फे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना देण्यात आले . यावेळी शिवसेना (उबाठा ) चे शहर अध्यक्ष दिपक धांडे , बबलू ब-हाटे , दिलीप सुरवाडे , निलेश महाजन , अबरार ठाकरे , यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक व महाविकास आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते .


