भुसावळ – येथील नाहाटा महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नेपाळ येथील भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना महाविद्यालय परिवार आणि माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सामूहिक श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मृतांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस व्ही पाटील उपप्राचार्य डॉ बी एच बऱ्हाटे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले


यानंतर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांनी मृतांना चिरशांती लाभावी म्हणून दोन मिनिटं स्तब्ध शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली यानंतर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील यांनी शांती मंत्र म्हटला आणि महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी गोकर्णी सरोदे आणि मीनल भारंबे यांना तसेच मृत पावलेल्या इतर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस व्ही पाटील तसेच उपप्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम पाटील पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती पाटील कार्यालयीन अधीक्षक श्री भगवान तायडे श्री सचिन पाटील तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील सचिव प्रा. डॉ.जी आर वाणी कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील सहसचिव प्रा. डॉ.चंद्रकांत सरोदे तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते


