पाल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न : रुग्णांना मोफत तपासणी नंतर दिली औषधी ;

भुसावळ – येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी , इनरव्हील क्लब रेल सिटी व देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने पाल तालुका रावेर येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर दिनांक २७ ऑगष्ट मंगळवार रोजी संपन्न झाले .यावेळी रुग्णांची अगदी मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधे (मेडिसिन ) देण्यात आले . .शिबिराचा सुमारे ३०० रुग्णांनी लाभ घेतला

सातपुडा शिक्षण प्रसारक संचलित लिलाबाई नामदेव पाटील आश्रमशाळा पाल ता. रावेर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता देवगिरी कल्याण आश्रमचे जिल्हाध्यक्ष डॉ निलेश भिरुड , जिल्हा उपाध्यक्ष डॉ किशोर मोरे , रोटरी अध्यक्ष अँड विशाल शहा , सचिव रो. अनिल सहानी , रो डॉ राहुल पांडे , इनरव्हील रेलसीटी अध्यक्ष मीनाक्षी धांडे , सचिव किरण जावळे , प्रोजेक्ट मॅनेजर वैद्य मृणाल पाटील , प्रांत सहसचिव तथा जिल्हा सचिव काशीराम बारेला यांच्या उपस्थितीत करण्यात आले . यावेळी रो . डॉ राहुल पांडे व डॉ किशोर मोरे यांनी प्रास्ताविक केले .

या शिबिराचा पाल तालुका रावेर यासह परिसरातील गाडऱ्या , जामण्या ,उसमळी, निमड्या , गारखेडा , गारबर्डी , न्हावी ,धुपा , पिपंरकुंड ,गावर्डी येथील जनजाती बांधवांसह महिलांनी व बालकांनी , नगरिकांनी व पाल येथील शालेय विदयार्थी व विद्यार्थिनी यांनी लाभ घेतला.

शिबिरात भुसावळ येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली .यात नेत्ररोग डॉ. समीर चौधरी , बालरोगतज्ञ डॉ. मिलिंद देवडा , कान नाक घसा तज्ञ डॉ सचिन राणे , हृदयरोग तज्ञ डॉ सुरज भोळे , जनरल तपासणी डॉ किशोर मोरे ,दंतरोगतज्ञ डॉ मकरंद चांदवडकर , डॉ विद्याधर भोळे ,डॉ सौ भोळे , डॉ अरविंद गाजरे ,स्त्रीरोग तज्ञ डॉ सुवर्णा गाडेकर , डॉ कीर्ती चांदवडकर , डॉ मृणाल पाटील तर त्वचारोग तज्ञ डॉ निलेश भिरुड , डॉ एस.एस. रावतोळे यांचे सह डॉ. स्वप्निल वढवेकर डॉ. भूषण लोखंडे ,डॉ महेश फिरके ,यांचा समावेश होता .याशिबिरात रुग्ण तपासणी नंतर रुग्णांना लगेच गोळ्या औषधे (मेडिसीन ) देण्यात आली हे मेडिसीन रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसीटी इनरव्हील क्लब , कल्याण वनवासी आश्रम यांनी उपलब्ध करून दिले .


यावेळी देवगिरी कल्याण आश्रम कार्यकर्ते अँड चित्रा आचार्य, अँड जास्वंदी भंडारी ,अँड जयश्री देशमुख ,पत्रकार उज्वला बागुल , स्वाती भोळे , तसेच किरण जावळे , सौ मेघा वाणी , डॉ सूर्यभान पाटील , नितीन धांडे , देवा वाणी , विकास पाचपांडे , सचिन राठोड , विरसिंग वसावे , दिनेश बारेला , यांचेसह मान्यवर उपस्थित होते

शिबीर यशस्वीतेसाठी कल्याण आश्रमचे डॉ किशोर मोरे डॉ निलेश भिरूड, रोटरी क्लब चे, अँड रो. विशाल शाह, रो अनिल साहनी, रो राहुल पांडे व इनरवील क्लबचे सौ मीनाक्षी धांडे, सौ किरण जावळे, व वैद्य मृणाल पाटील, व प्रत्येक पाड्यावर शिबिराविषयी निरोप देण्याचे कार्य दिनेश बारेला, श्री विरसिंग वसावे यांनी केले. तसेच रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसीटी , इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसीटी व कल्याण आश्रमच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .