वरणगाव –
विक्रम साराभाई यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेतून वरणगाव, सावदा व अकोला येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले
रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन व जनता शिक्षण मंडळ खिरोदा संचलित कलाम सायंटिस्ट सेंटरच्या वतीने राज्यस्तरीय विक्रम साराभाई विज्ञान प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध शाळेतील एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते पहिल्या फेरीत शाळा स्तरावरती विज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात आली यामधून दुसऱ्या फेरीसाठी 78 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेतली तिसऱ्या फेरीत दहा विद्यार्थ्यांची निवड झाली. दहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली या स्पर्धेत प्रथम मनीष मधुकर माळी (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव) द्वितीय खान नइम खान (डायमंड स्कूल सावदा) तृतीय अक्षरा नंदू इंगळे (जे जी कॉन्व्हेंट हायस्कूल शिवणी अकोला) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले
विजयी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक तीन हजार रुपये रोख प्रशस्तीपत्र व मेडल द्वितीय क्रमांकला दोन हजार रुपये रोख प्रशस्तीपत्र व तृतीय क्रमांकाला एक हजार रुपये रोख प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कोर कमिटीचे डॉ. चंद्रमौली जोशी संदीप पाटील सुनील वानखेडे समन्वय भारती बढे यांनी काम पाहिले
यावेळी बोलताना डॉ. चंद्रमौली जोशी म्हणाले की विद्यार्थ्यांना वैज्ञानिकांनी केलेल्या कार्याची ओळख करून दिली पाहिजे त्यांचे विचार पोहोचले पाहिजे यामुळे संशोधन वृत्तीचे बिजा रोपण होऊन भविष्यातला महासत्ता होण्याचा मार्ग मोकळा होईल



