शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी ॲड ललिता पाटील यांची नियुक्ती :


जळगाव – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी ॲड ललिता श्याम पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले भरीव काम त्यांच्यातील कार्यकर्ते संघटन , कौशल्य तसेच अमळनेर येथे संपन्न झालेला शिवसेनेचा मेळावा यशस्वीतेसाठी ललिता पाटील यांनी केलेले संघटनात्मक कार्य यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांची राज्य संघटक पदी नियुक्ती केली .ही नियुक्ती त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे.

अल्पावधीत झालेल्या त्यांच्या निवडीमुळे अंमळनेर तालुका व शहर शिवसेनासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहव व नवचैतन्य निर्माण झाले आहे . .

या निवडीबद्दल जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत , सहसंपर्क प्रमुख गुलाब वाघ , जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे , डॉ हर्षल माने , महानंदा ताई पाटील , युवासेना सचिव विराज कवाडिया , जिल्हा युवासेना प्रमुख निलेश चौधरी तसेच जिल्ह्यासह अमळनेर शहरातील शिवसेना पदाधिकारी , मान्यवर व शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .