भुसावळ: हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाणी वाढले आहे. हतनूर धरणाचे १८ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून ८४ हजार ७७३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मध्य प्रदेशात आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तापी- पूर्णा नदीला पूर आला असून, हतनूर धरण क्षेत्रात पाण्याचा स्रोत वाढला आहे . आजची पाणी पातळी – 210.620 मी.तर एकुण पाणी साठा= 218.80 दलघमी एकुण पाणी साठा टक्केवारी 56.39% आहे . हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी धरणाचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे.


