भुसावळ – येथील ब्राह्मण संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लघुरुद्र पुजा तसेच समाजबांधवांचा सत्कार सभारंभ सपन्न झाला यानिमित्त आज दिनांक २५ ऑगस्ट रविवार रोजी मुक्ताईनगर अंतुर्ली येथील गुरुवर्य प . पू श्री देवनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली .


यावेळी आपले आशिर्वाद पर मनोगत व्यक्त करतांना श्री देवनाथ महाराज यांनी ब्राह्मण संघाच्या शताब्दी महोत्सवा निमित्त ब्राह्मण ज्ञातीतील गरीब , कष्टकरी , मध्यम वर्गीय तसेच उच्च पदस्थ व श्रीमंत अशा सर्व घटकांचा आयोजीत केलेला सत्कार या बाबत समाधान व्यक्त केले . व समाजातील विविध घटकांना एकत्र करून समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्नांनाचे कोतुक करून कार्यास शुभ आर्शिवाद दिले . इतर धर्मियांन कडुन धर्मा बद्दल चे प्रेम व निष्ठा आपल्या अंगी बाळगुन आपणही सनातन धर्मा च्या कार्यात सर्वांनी मिळून प्रयत्न करावे . व ज्ञातीच्या कार्या सोबतच धर्म व राष्ट्र कार्य आपणा सर्वांचे हातून घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली

सांगता समारोह समिती चे संयोजक गणेश वढवेकर यांनी प्रास्ताविक केले . या नंतर सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आला . कु . नुपूर भालेराव , कु . साक्षी कुळकर्णी या बाल कलाकारांनी नृत्य सादर केले . तर कु . धनश्री जोशी हिने भावगीत सादर केले . कु श्रावणी आठवले , कु . गौरी परचुरे कु . हेतल महाजन कु वैष्णवी देशपांडे यांनी बासरी वादन करून जयस्तुते हे स्वांतत्र्यवीर सावरकर रचित गीत सादर केले . या वेळी उपस्थित समाज बांधवांचा जेष्ठते नुसार तसेच विविध क्षेत्रातील प्राप्त प्रथित यश संपदने नुसार सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले .

संघाचे माजी अध्यक्ष ॲड दिलीप पंडित यांनी ब्राह्मण संघाच्या वास्तुचे नुतनीकरण करून ते अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करावे असे आवाहन केले . या वेळी संघाचे माजी अध्यक्ष संजय जोशी , रघुनाथ मांडळकर , माजी सचिव अनिल हिंगवे , दिपक अडावदकर , व अमोद टेभुर्णीकर व्यासपीठावर उपस्थित होते .

दरम्यान सकाळी दिपक पाथरकर गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लघुरुद्र पुजनाचे पौरोहित्य केले . या वेळी श्री व सौ अँड . चित्रा प्रसाद आचार्य श्री व सौ भालचंद्र जोशी यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक संपन्न झाला .

सुत्र संचालन भालचंद्र जोशी , शंभु गोडबोले , यांनी केले . तर शंतनु गचके , प्रसन्न गंधे , संदीप जोशी , रमाकांत भालेराव सागर पत्की , संजय बोचरे , श्रीमती कल्पना दामले , सौ . रुपाताई कुळकर्णी , सौ मृणाल गाडगीळ , मिलींद गोरवाडकर , विवेक महाजनी , व सघांचे व्यवस्थापक अशोक पाटील फोटो ग्राफर अभिमन्यु टेमकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . आभार शंभु गोडबोले यांनी मानले तसेच कार्यक्रमाचा समारोप आनंद फडके यांच्या कॅटटींग सेवेच्या माध्यमातून सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत समाज बांधवांनी आपल्या शुभेच्छा व सद्भावना व्यक्त केल्या व संघाच्या पुढील शतकातील वाटचालीनां शुभेच्छा दिल्या .



