भुसावळ – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतेच राष्ट्रीय अंतराळ दिवसानिमित्त व्याख्यान सत्र संपन्न झाले. या निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ आर पी फालक , आणि प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन एस राणे हे उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना प्रा डॉ दयाघन राणे यांनी जागतिक स्तरावरच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचा गोषवारा सादर केला. आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेपासून करण्यात आलेले विविध प्रकारचे संशोधनाचे प्रकल्प यांची माहिती दिली. तसेच चंद्रा चे भारतीय समाज आणि संस्कृती, मधील स्थान आणि एकंदरीत चंद्राशी असलेले भावनिक नाते आणि पौराणिक महत्त्व ही स्पष्ट केले. राष्ट्रीय अंतराळ दिवस ज्या निमित्ताने जाहीर करण्यात आला त्याची पार्श्वभूमी म्हणून चांद्रयान मोहीम विस्तृत पणाने उपस्थितांसमोर स्पष्ट केली. या मध्ये चांद्रयान १ पासून आज पर्यंत इस्रो ने केलेले अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील कार्याचा यशस्वी इतिहास आणि आज ची सद्यस्थिती यांची तांत्रिक माहिती सुध्दा सखोल पणाने स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी भारतीय अंतराळ संशोधनाच्या मोहीम मधील इस्रो चे स्थान आणि तेथील शास्त्रज्ञांनी केलेला संघर्ष स्पष्ट केला. भारतीय शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील कार्याचे महत्त्व स्पष्ट करून त्यांच्या “विंग्ज ऑफ फायर” या पुस्तकातील संघर्ष मधून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. व्याख्यान सत्र संपल्यावर उपस्थित विद्यार्थ्यांना चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणाचे अॅनिमेशन दाखवले. तसेच चांद्रयान ३ चे सॉफ्ट लँडिंग होत असतानाच्या लाईव्ह रेकॉर्डिंग ची व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. त्याच वेळी त्या क्लिप मधील तांत्रिक संदर्भ ही प्रा डॉ दयाघन राणे यांनी स्पष्ट करून सांगितले.
कार्यक्रमाचे सुरुवातीलाच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आर पी फालक तसेच प्रमुख वक्ते प्रा डॉ दयाघन राणे यांचे स्वागत महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा आर डी भोळे यांनी तर प्रा भोळे यांचे स्वागत महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा डॉ जे बी चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा आर डी भोळे यांनी, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा संगीता धर्माधिकारी यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ जी पी वाघुळदे, प्रा डॉ जयश्री सरोदे, प्रा डॉ माधुरी पाटील, प्रा. डॉ जे बी चव्हाण, प्रा श्रेया चौधरी, प्रा जागृती सरोदे, प्रा आरती नवघरे, प्रा सुशीला भाटे, प्रा गायत्री नेमाडे, प्रा धनश्री नेहेते, प्रा कामिनी चौधरी यांच्या सह सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. असे प्रसिध्दी प्रमुख प्रा डॉ संजय चौधरी यांनी कळविले आहे.



