भुसावळ –
नेपाळमधील दुर्दैवी घटनेत भुसावळ शहर परिसरातील निष्पाप 27भाविक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.काल दि. 24 ऑगस्ट रोजी भारत विकास परिषद भुसावळ शाखेच्या कार्यकारणीची बैठक घेण्यात आली या बैठकीत प्रथम नेपाळ येथील मृत भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मृत भाविक परिवारांच्या दुःखात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही किंवा त्यांचे दुःख वाटूनही घेऊ शकत नाही. म्हणून एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक भान ठेवून मृत भाविकांना श्रद्धांजली म्हणून दिनांक 27/08 ची होणाऱ्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धा आणि 01/09 ची भारत को जानो ह्या दोन्ही स्पर्धा पुढे घेण्यात यावा येत असा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आणि आगामी दोन्ही स्पर्धा दिनांक–24/सप्टेंबर/2024 मंगळवार रोजी प्रभाकर हॉल या ठिकाणी घेण्यात येतील..

बैठकीला सतिश खडायते हरीष कोल्हे गौरव हिंगवे सौ.राधा चव्हाण डॉ.निलीमा नेहेते योगेश मांडे विलास फालक डॉ.अर्चना खानापूरकर श्याम दरगड भुषण वाणी रमाकांत भालेराव कपिल मेहता श्रीकांत जोशी भुषण वैद्य गिरीष कुलकर्णी आनंद फडके राजेश लढ्ढा रुपेश जैन उज्वल सराफ कुणाल महाजन विशाल अग्रवाल तेजस महाजन संजय चौधरी सुजित भोळे आदी उपस्थित होते..


