भुसावळ – बदलापूर येथे चिमुरड्यांवर केलेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ भुसावळ शहर कॉग्रेस कमेटी शिवसेना महा विकास आघाड़ी तर्फे महात्मा गांधी पुतळ्या जवळ सुमारे एक तास मौन आंदोलन करण्यात आले .
यावेळी महात्मा गांधी पुतळ्या जवळ त्या नराधम आरोपीवर कठोर कारवाई करून लवकरात लवकर फाशी दया अशी मागणी करून तोंडाला काळ्याफिती बांधून निषेध करण्यात आला . सकाळी 11 वाजेला आंदोलन सुरू केले यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रवींद्र निकंम, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान,शिवसेना शहर अध्यक्ष दीपक धाडे, दीलीप सुरवाडे, ईम्रान खान प्रदेश सचिव युवा कांग्रेस, सलीम गवली, महेबुब खान, संतोष साळवे , संजय खडसे, भगवान मेढे,राम अवतार परदेशी,राजु डोगरे, शैलेन्द्र नन्नवरे, हमीद शेख,संध्यानशिव सर,अनवर तडवी,असगर भाई, हमीदा गवली फातेमा तडवी,विकास खडके,कुर्हा सरपंच प्रमोद ऊमरकर, सुधाकर भडगुजर व अनेक पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते



