छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीत दोन शिल्पांचे अनावरण

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी कलेचा प्रचार आणि जतन करण्याच्या मध्य रेल्वेच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीत २ शिल्पांचे अनावरण केले.

राम करन यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. २३.८.२०२४ रोजी मध्य रेल्वेच्या कलेचा प्रचार आणि जतन करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीत दोन शिल्पांचे अनावरण केले.

कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या कला स्पर्धेची विजेती भारतीय कलाकार श्रीमती सोनाली अय्यंगार यांनी
भगवान गणपती-मुंबईचे मूलतत्व आणि भगवान हनुमान- कालातीततेचे प्रतीक यांच्या बनवलेल्या शिल्पांचे महाव्यवस्थापकांनी अनावरण केले.

कलाकाराचा सत्कार करताना श्री यादव म्हणाले, “हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे आणि मध्य रेल्वे भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अशाच प्रकल्पांसाठी आणखी संभाव्य ठिकाणे शोधणार आहे. या उपक्रमाद्वारे, आम्हाला आशा आहे की, भारतीय कलाकारांना देशातील इतर ऐतिहासिक आणि प्रसिद्ध वास्तूंमध्ये त्यांचे कार्य भारत आणि परदेशातील लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी अशाच संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

श्रीमती अय्यंगार यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील दोन शिल्पे दीर्घायुष्य आणि वास्तववाद दर्शविण्यासह मुंबई आणि भारतातील लोकांची आधुनिकतेचे प्रतिनिधित्व, व्हायब्रंट दृष्टिकोन आणि उत्सवी वृत्ती मल्टीमीडिया प्रतिनिधित्व करतात.

शिल्पे तयार करण्याची प्रदीर्घ प्रक्रिया, मातीची शिल्पकला, मेणाचे पॉलिशिंग, पीओपी शिल्पकला, रबर द्रवपदार्थाचे अनेक थर, त्यानंतर बेस शिल्प तयार करण्यासाठी फायबरग्लासचे अनेक कोट आणि त्यानंतर वेल्डिंग, पेंटिंग, दोन शिल्पे सुशोभित करणे, अशी प्रदीर्घ प्रक्रिया असून कलाकाराने विक्रमी १ महिन्यात पूर्ण केले.

श्रीमती सोनाली अय्यंगार यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को) जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांच्या कलेद्वारे योगदान देणारी आहे आणि ही कला आता वेळ आणि ट्रेंडच्या पलीकडे जाणारा वारसा जपत असून इमारतीच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनली आहे.

मध्य रेल्वे स्वदेशी संस्कृतीचे जतन आणि प्रसार करण्याच्या या उपक्रमामुळे अशा पात्र भारतीय कलाकारांसाठी भविष्यात अधिक संधी निर्माण करण्यास उत्सुक आहे.

यावेळी मध्य रेल्वेचे प्रधान विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते