भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला व तरुणींसाठी 22 व 23 रोजी विनामूल्य गरबा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन शहरातील संतोषी माता सभागृहात करण्यात आले आहे.

अॅडव्हान्स बुकींग केल्यास शंभर रुपयांची सुट
25 वर्षांपासून गरबा प्रशिक्षक असलेल्या दीपा पटेल व अपूर्वा फेगडे या मार्गदर्शन करणार आहेत तर नियमित क्लासेससाठी देखील यावेळी प्रवेश निश्चित करता येणार आहे. नियमित क्लासेसाठी 22 ऑगस्टपर्यंत अॅडव्हान्स बुकींग केल्यास शंभर रुपयांची सुट देण्यात येणार आहे शिवाय ग्रुपने बुकींग केल्यास विशेष सवलत दिली जाणार आहे. गरबा प्रशिक्षण वर्गाचा अधिकाधिक तरुणी व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दिवा 9158840481 व 9921477674 वर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


