भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे विभागीय कार्यालयात बैठक संपन्न ;

भुसावळ – युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री भारत सरकार श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आज 21.08.2024रोजी विभागीय रेल्वे कार्यालय, भुसावळ येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्यासोबत विविध रेल्वे विषयक मुद्द्यांवर चर्चा केली.

बैठकीच्या सुरुवातीला, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी विभागात सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा कार्यांची सविस्तर माहिती माननीय राज्यमंत्री यांना दिली. यामध्ये विविध रेल्वे प्रकल्प, अपग्रेडेशन आणि स्थानिक सुविधांच्या संदर्भात माहिती सादर करण्यात आली.

यानंतर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित मुद्द्यांवर पुढीलप्रमाणे चर्चा केली
रोड अंडर पास आणि रोड ओव्हर ब्रिज याबाबत चर्चा
पाचोरा – जामनेर – बोदवड रेल्वे मार्ग प्रगती
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मलकापूर, नांदुरा ,रावेर येथील सुरु असलेले कार्याची माहिती
पिंपळगाव येथील जमीन अधिग्रहण बाबत चर्चा
खंडवा -सनावद मेमू चा भुसावळ पर्यंत विस्तार करणे
आणि या प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे निर्देश दिले. बैठकीनंतर माननीय केंद्रीय राज्यमंत्री यांनी विभागीय नियंत्रण कार्यालयाला भेट देऊन निरीक्षण केले आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

या बैठकीला अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार सुमन , अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक एम के मीना आणि सर्व शाखा अधिकारी हजर होते.