भुसावळ एमओएच शेडमध्ये नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलचे उद्घाटन :

भुसावळ – येथील इलेक्ट्रिक लोको शेड (एमओएच) शेडमध्ये नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी दिनांक २०.०८.२०२४ रोजी केले.
भारतीय रेल्वेच्या क्रू कर्मचार्‍यांसाठी हि एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलची सोय करण्यात आली आहे. या सुविधेमुळे पुरुष आणि महिला क्रू कर्मचार्‍यांसाठी त्यांच्या ड्युटी दरम्यान वॉशरूम चा वापर अधिक सुलभ होणार आहे.

नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलची सुविधा देण्यामागील उद्दिष्ट म्हणजे रेल्वेच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देणे होय. या नव्या सुविधेमुळे रेल्वे कर्मचार्‍यांचा कामाचा अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल.

वॉटरलेस युरिनलची सामान्य वैशिष्ट्ये:
मॉड्यूलर डिझाइन:
एसएस बॉडी पफने भरलेल्या सँडविच पॅनेल्ससह पावडर कोटेड आतल्या केबिनची रुंदी सुमारे 550 मिमी (पफ मॉडेल).
एसएस बॉडीसह आतल्या डिझायनर शीट्स, आतल्या केबिनची रुंदी 595 मिमी (एसएस मॉडेल).
लोकोमोटिव्हवर सहजपणे स्थापित आणि काढता येते.

युनिसेक्स युरिनल पॉट डिझाइन:
पुरुष आणि महिला दोघांसाठी उपयुक्त एसएस कमोड डिझाइन.
सिलिकॉन मेंब्रेनसह सुसज्ज जे नॉन-रिटर्निंग वाल्व म्हणून कार्य करते.
कमोडला एसएस वायर मेषसह फिट केले आहे.
युरिनल पॉटला एपॉक्सी कोटिंग करण्यात आली आहे, ज्यामुळे पॉट जल प्रतिरोधक बनतो.

दुर्गंधी प्रतिबंध:
सिलिकॉन मेंब्रेनसह सुसज्ज जे नॉन-रिटर्निंग वाल्व म्हणून कार्य करते.
केबिनमध्ये परफ्यूम डिस्पेंसर बसविण्यात आला आहे.
युरिनल मॅट्स आणि नेफ्थलीन बॉल ठेवण्याची व्यवस्था आहे.

हे कार्य इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ द्वारा केले असून यामुळे क्रू स्टाफला मदत होईल. या उपलब्धीसाठी मंडळ रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ ला पुरस्कार जाहीर केले आहे.

याप्रसंगी अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार सुमन आणि संबंधित शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.